राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना तूर्त दिलासा नाही

 मलिक यांना सध्या कोणताही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही.  याचिकेतील अनेक मुद्दय़ांवर चर्चा बाकी 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना तूर्त दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. मलिक यांनी ईडीच्या कारवाईला आव्हान देत तुरुंगातून सुटका करण्याची विनंती केली होती.यासंबंधित अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळले. मात्र मलिक यांच्या याचिकेतील अनेक मुद्दय़ांवर चर्चा बाकी आहे. त्या साठी नंतर सुनावणी करू, असेही न्यायालयाने नमूद केले.


न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि न्यायमूर्ती एस. एम. मोदक यांच्या खंडपीठाने मलिक यांच्या विनंतीवरील निर्णय 3 मार्चला राखून ठेवला होता. त्याआधी तीन दिवस दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतले होते. मलिक यांनी हेबिअस कॉर्पस अर्ज दाखल केला होता. ईडीने केलेली अटक 'बेकायदा' असल्याचे म्हणणे मांडत मलिक यांनी एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. ही विनंती खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावली. मलिक यांना सध्या कोणताही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही. त्यांच्या याचिकेतील अनेक मुद्दय़ांवर चर्चा बाकी आहे. त्यासंबंधित सुनावणीची तारीख नंतर ठरवली जाईल, असे खंडपीठ म्हणाले. .

Post a Comment

Previous Post Next Post