घरेलू कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा




प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे घरेलू कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी मोर्चेकरी महिलांनी आमच्या मागण्या मान्य करा ,अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

शासनाकडून घरेलू कामगारांना कोणत्याच मुलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन देखील काहीच हालचाल होत नसल्याचे दिसत आहे.यातून शासन घरेलू कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पहात नसल्याचे आता लपून राहिलेले नाही.त्यामुळे शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरोधात आणि आपल्या मुलभूत न्याय हक्कांबाबत लोकशाहीच्या मार्गानेआवाज उठवण्यासाठी इचलकरंजी येथे घरेलू कामगार संघटना संयुक्त क्रुती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.तसेच आमच्या मागण्या मान्य करा ,अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यावेळी घरेलू कामगारांना कोविड अनुदान १५०० रुपये मिळावे ,सन्मानधन मिळावे ,वयाचे ६० वर्ष पूर्ण झालेल्या घरेलू कामगारांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन मिळावी तसेच किमान वेतन ,आठवड्याची सुट्टी ,पगारी वार्षिक व आजारपणाची रजा , मातृत्व लाभ यासह घरेलू कामगार कल्याण खाली मंडळ अधिक सक्षम करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी ,अशा विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आले.

यावेळी घरेलू कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने , धोंडिबा कुंभार ,पार्वती जाधव ,शाजादबी मुजावर ,सुवर्णा लाड ,मंगल सुर्वे ,आनंदा गुरव , सुनील बारवाडे ,प्रतिमा चौगले ,मंगल गायकवाड ,स्वाती बन्ने ,छाया शिंदे ,कलावती धुर्वे ,अफरिन काझी ,अश्विनी नलवडे ,तुळसाबाई काटकर ,शैताज शेख ,शारदा तारळेकर , सुवर्णा देवसानी यांच्यासह घरेलू कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post