माजी आमदार मनोहरशेठ भोईर व आमदार बाळारामशेठ पाटील यांच्या शुभहस्ते

  मोहोपे येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर जलकुंभ व पाईप लाईनच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.


प्रेस मीडिया ऑनलाईन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

*शिवसेनेचे उरण मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर* यांनी सध्या आमदार नसून सुध्दा संपूर्ण मतदारसंघामध्ये *महाविकासआघाडी सरकारच्या* माध्यमातून विकासकामांचा धडाकाच लावला आहे. *पाणीपुरवठा मंत्री मा.श्री.गुलाबराव पाटील* यांच्याकडे *माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी मतदार संघातील ज्या ज्या गावांना पाणीटंचाईचा प्रश्न आहे त्या गावांना जालजीवन मिशन अंतर्गत सामावून घेण्याची व तेथे पाणी टंचाई सोडविण्याकरिता मागणी करण्यात आली होती. त्या योजनेअंतर्गत शुक्रवार दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी *माजी आमदार मनोहरशेठ भोईर व आमदार बाळारामशेठ पाटील* यांच्या शुभहस्ते  मोहोपे येथे जलजीवन मिशन अंतर्गत जलकुंभ उभारणे व बारवई ते मोहोपे पाईपलाईन या कामाचे भूमिपूजन पार पडले. आपल्या मराठी सण मकरसंक्रातीच्या गोड शुभमुहूर्तावर पाण्याचा प्रश्न सोडवून सदर प्रश्न मार्गी लावल्यामुळे मोहोपे येथील ग्रामस्थांनी *पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांचे विशेष आभार मानले.

या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, तालुकासंपर्कप्रमुख अंनताशेठ पाटील, उपतालुकासंघटक सुधीरशेठ पाटील, उपतालुकाप्रमुख विष्णू लहाने, उपतालुकाप्रमुख जगदिश मते, विभागप्रमुख नितिन पाटील, उपविभप्रमुख किशोर पाटील, सरपंच बारवई निलेश बाबरे, समाजसेवक महेंद्र गायकर, उपसरपंच मोहन लबडे, जि.प.सदस्य राजेंद्र पाटील, भागीरथ चोरघे व शिवसैनिक उपस्थित होते.


बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा

85 30 83 87 12

Post a Comment

Previous Post Next Post