पुण्यनगरित प्रवासी मुलीची दिशा भूल करून केला सामुहिक बलात्कार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

 पुणे दि. ६ :- पुणे मध्ये सामुहिक बलात्कार काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिडीत मुलगी दि. ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक वर आली असता आरोपीनी दिशाभूल करीत मुलीला सांगितले आता रात्रीचे गाड्या नाहीत तु गावी कशी जाणार असे बतावणी करून तिला रेल्वे स्थानक बाहेर आणले तुमची राहण्याची सोय करू असे म्हणत तीला रिक्षातून वानवडी परिसरात नेले. तिथे त्याच्या वर रात्री आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. परत दुसऱ्या दिवशी एकुण सात जणांनी तिच्या वर आळीपाळीने बलात्कार केला. 

या घटनेने जिल्हायात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १४ वर्षीय पीडित मुलगी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानक वर आली असता त्यावेळी आरोपीनी रात्रीचे गाडी नसल्याचे सांगून तिला रिक्षातून वानवडी परिसरात घेऊन गेले तेथे आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कार प्रकरणात दोन रेल्वे कर्मचारीच्यांचा समावेश असून इतर रिक्षाचालकांचा ही समावेश आहे हा प्रकार काल उघडकीस आला. त्यानंतर वानवडी पोलीसांनी तात्काळ या प्रकरणातील एकुण आठ नराधमांना अटक केली आहे. ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने या बाबत संपूर्ण कारवाई झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार आहे. या घटनेतील पिडीत मुलीची प्रकृती गंभीर असुन तिच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post