देहूरोड शहरात अपघात टाळण्याकरिता मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

पिंपरी चिंचवड़ देहूरोड दि. ६ सप्टेंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहूरोड शहराचे अध्यक्ष जाॅर्ज दास यांनी रस्त्यावर  व बाजार पेठेत, वर्दळीच्या ठिकानी मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करावा.अशा मागणी चे पत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी देहूरोड छावनी मंडळ व देहूरोड शहर वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात आले. शहरातून जाणाऱ्या महामार्ग सह अंतर्गत सर्वच रस्त्यावर आणि प्रमुख चौकांमध्ये  व बाजार पेठेत मोकाट जनावरांचे  जागोजागी बस्तान वसलेले दिसतात ठिकठिकाणी ही जनावरे निर्धास्तपणे तासन तास बसून राहत असल्याने वाहतुक कोंडी निर्माण होते.

या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि  नागरिकांनी टाकलेले शिळं अन्न,व कचराकुंडी मध्ये पडलेला पालापाचोळा, खराब भाजीपाला  खान्यासाठी हि जनावरे मोकाटपणे हिंडताना दिसून येतात ,एवढेच नव्हे तर ते मुख्य रस्त्यांवर घोळक्याने ठाण मांडून बसतात.आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात शेण (मल)मूत्र पडल्या मुळे त्यावरून वाहने घसरून अपघात होतात, दिवसभरात अनेक वेळा मोकाट जनावरांची परस्पर मध्ये झुंज होती.त्यावेळी रस्त्यांवरून बेफाम पणे एकमेकांच्या मागे धावतात, यामुळे लहान बालकांना,माहिलांना,व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढ़ावे  लागते.आपण या जनावरांच्या मालकांवरती योग्य कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून त्या जनावरांची सोय करावी.असे निवेदन जार्ज दास यांनी देहूरोड छावनी मंडळ व पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग)पि.चिं आयुक्तालय देहूरोड पुणे यांना देण्यात आले. यावेळी मलिक शेख,डॉमाणिक दास,असिफ सय्यद,रॉबिन राजन अक्षय टिळेकर,शुभम जाधव प्रवीण मुत्तू उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post