महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

            पिंपरी चिंचवड शहरामध्ये १ जुलै पासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त मा. राजेश पाटील , महापौर मा. माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप , भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे याना निवेदन दिले होते. परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे? असा सवाल करीत आज शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी महापौर कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु मा. महापौर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत अपना वतन संघटनेच्या वतीने पे अँड पार्क धोरण रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली.त्यावेळी मा. महापौर माई ढोरे यांनी याबाबत शहरातील दोन्ही अमदारांशी चर्चा करून पे अँड पार्किंग चा विषय ऑगस्ट मधील सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर मांडून त्या मध्ये योग्य त्या सुधारणा करून जनतेला आर्थिक भुर्दंड पडणार नाही याची काळजी घेऊ  तसेच याबाबतीत पालिका आयुक्तांसोबत सर्व संघटनांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

            यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, संघटनेचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष हमीद शेख ,महिलाध्यक्ष सौ. राजश्री शिरवळकर, अखिल भारतीय छावा मराठा युवा महासंघ चे अध्यक्ष धनाजी येळकर , संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे, ग्राहक पंचायत चे अमोल उबाळे, नॅशनल ब्लॅक पँथर च्या संगीता ताई शहा ,सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार, कालीम शेख, यशवंत सूर्यवंशी ,सुधीर वाकळे आदी उपस्थित होते.


आपले विश्वासू ,


मा. सिद्दीकभाई शेख  ,

अध्यक्ष ,अपना वतन संघटना ,

मो. ९६६५४८४७८६

Post a Comment

Previous Post Next Post