जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे यांनी हजर राहून पूरस्थितीची पाहणी केली

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी येथे अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. इचलकरंजी शहर तसेच लगतच्या परिसरात पाणी साचले आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात सकाळी ८ वाजल्यापासून *जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे  यांनी हजर राहून पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी आवाडे समर्थक व रेस्क्यू टिमने पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत सुखरूप ठिकाणी हलविले. नागरीकांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे साहेब यांनी पूरग्रस्त नागरिकांना सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post