जयसिंगपूर मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

  

हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले 


लग्नाचे आमीश दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेऊन अश्लील चाळे करणारा अनुराग सालेचा आणि मुलीला जातीवाचक शिवीगाळ करणारी त्याची आई सुनिता सालेचा या दोघांवर जयसिंगपूर पोलिस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी मुलगा अनुराग जवाहरलाल सालेचा व त्याची आई सुनिता जवहरलाल सालेचा हे दोघे पिढीत मुलीच्या घराच्या समोरा समोर राजीव गांधी नगर 8 वी गल्ली येथे राहतात. 

हे एकमेकांच्या शेजारी असल्याने  एकमेकाला चांगले ओळखतात. दरम्यान या दोघा मध्ये मोबाईल चॅटींग,अश्लील बोलने व शारीरिक संबंध  यामुळे यांचे प्रेम लग्न करण्या पर्यंत जुळले होते, आहेत. तर  या  मुलीला लग्नापासुन वंचित ठेवण्या करिता वारंवार जाती वाचक शिवी देत आहे. तसेच तु माझ्या अनुरागचा नाद सोड, नाही तर मी तुला  पोलिस ठाणे मध्ये तुझ्या विरोधात तक्रार देऊन तुलाच आडकवीन अशी धमकी मुलाची आई सुनिता सालेचा वारंवार  देत आहे. 

असे पिढीत मुलीने स्व:ता जयसिंगपूर पोलिस ठाण्या मध्ये हजर राहून फिर्याद दिली आहे. आरोपी अनुराग जवहरलाल सालेचा, आई सुनिता जवहरलाल सालेचा यांच्यावर  कलम 376 , कलम 504 , कलम 506 कलम 34 ने  जयसिंगपूर पोलिस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल  PSI वाघ तर पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैजंने हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post