ब्रेकिंग न्यूज : मराठी भाषेवर पोलीसांची अरेरावी.... ग्राम पंचायत अध्यक्षा- सौ मेघा मोहीतेविक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

    बेडकिहाळ येथील आरोग्य केंद्रामध्ये लसीकरनावरुन भाजप व कॉंग्रेस मध्ये मोठा वाद चव्हाट्यावर आनला. बेडकिहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून 18 वर्षावरीव दिव्यांगना कोरोना लसीकरण करन्यासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व स्टॉफ बोलवले होते. त्यावेळी लसीकरण कोठे करायचे या वादावरुन मोठा विरोध सत्ताधारी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद चालू असताना ग्राम पंचायत चे अध्यक्षा व सर्व सदस्य यांनी लसीकरण आम्ही कुठल्याही खासगी संस्थेला देऊ देनार नाही असे सत्ताधारी मिळुन विरोधकांना सांगत होते. त्यावेळी अध्यक्षा- मेघा मोहीते या पोलिस अधिकाऱ्यांना मराठीतुन समजाऊन सांगन्याचे प्रयत्न करत होत्या. मात्र सदलगा पोलिस स्टेशनचे फौजदार आर.वाय. बिळगी यांनी अध्यक्षा यांना तुम्ही कन्नडमध्ये सांगा मराठीमध्ये बोलु नका असे अरेरावीची भाषा करुन आरोग्य केंद्रातुन बाहेर जावा तुमची मराठी भाषा येथे चालनार नाही. असे आपल्या खाकिची दहशत दाखवत होते. 

त्यावेळी ग्राम पंचायतचे सदस्य सचिन पाटील, प्रमोद पाटील व सर्व सदस्य आम्हाला भारतीय राज्य घटनेनुसार आमचे म्हणणे कोणत्याही भाषेत मांडू शकतो. यास कोणाचाही विरोध असू नये तरीही फौजदारांनी कायद्याच्या गैरवापर करून मराठी भाषिंकावर दादागिरी करत होते. याच्या  पुढे कुठल्याही अधिकार्यांचे भाषाबद्दल अपशब्द काढले तर त्यांची गय केली जाणार नाही. असे ग्रा पंचायत अध्यक्षा- सौ मेघा मोहीते यांनी म्हनटले.  निपाणी मतदारसंघात सत्तेचा गैरवापर मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले करत असून यास पोलिस व इतर अधिकारी बळी पडत आहेत. हे कोठेतरी थांबले पाहिजे. यापुढे निपाणी व परिसरामध्ये मनमानी करत सत्तेचा गैरवापर खपवून घेतले जाणार नाही. जर जनता आक्रमक झाली तर त्यांना सळु काय पळु करुन टाकतील.असेच जर चालतच राहिले तर  पुढील काळात राज्य पातळीवर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या घटनेचा आंदोलन करुन विरोध दर्शवु असे पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्षा- मेघा मोहीते या म्हनाल्या.

    त्यावेळी सर्व ग्रा.पंचायतचे सदस्य व उपाध्यक्ष सौ.स्वाती कांबळे या उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments