सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी- इनामचे सर्वपक्षीय निवेदन.





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  पूर्ण भारत देशात कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत.यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यापाऱ्यांनी आजपर्यत जवळपास ६४ दिवस आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून लॉकडाउनला पाठिंबा दर्शविला आहे. दुकान भाडे,नोकर पगार तसेच इतर सर्व प्रकारचे कर असे खर्च असताना सर्वात जास्त कर भरणारा व्यापारी हा एकच वर्ग सहनशील वर्गात मोडत असून त्यांनी आजपर्यत शासनाचे धोरण स्वीकारले असून त्याचे पालनही केले आहे.कोरोनवर मात करण्याचा एकमेव पर्याय लसीकरण आहे शासन लस उपलब्ध करून देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून त्याचे नुकसान व्यापाऱ्यांनी सहन केले आहे. इतर किरकोळ व्यावसायिकांच्या पोटाचा प्रश्न या गोंडस नावाखाली बाजार वगरे भरवण्यास शासनाने परवानगी दिली आहे तेथे अजूनही गर्दी होत असून यावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.

 मर्यादित ग्राहक असणाऱ्या व्यापाऱ्यांवर निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येत आहे. आता व्यापारी वर्गाची सहनशीलता संपली असून व्यापारी येथून पुढे कोणताही लॉकडाऊन सहन करणार नाहीत.दिनांक १५ जून पासून व्यापारी आपली दुकाने नियमित वेळेत मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टनसिंग नुसार उघडतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी.सर्व व्यापाऱ्यांच्या भावना शासनापर्यत पोहोचवाव्यात अशी मागणी सर्वपक्षीय निवेदनाद्वारे इनामने प्रांताधिकारी यांच्याकडे केली असून प्रांताधिकारी यांनी व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना शासनाकडे पोहचवण्याची ग्वाही दिली.यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे,बाळासाहेब कलागते,अहमद मुजावर,शिवसेनेचे विजय जोशी,शितल मगदुम,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद अणूरकर,अभिजित रवंदे,भारतीय जनता पार्टीचे विनोद कांकाणी,सुनील मुंदडा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवी गोंदकर,प्रताप पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यासागर चराटे,प्रिंटिंग असोसिएशनचे महादेव शिंदे,संजय आगलावे,नरेंद्र हरवंदे,पांडुरंग मेटे तसेच इचलकरंजी नागरिक मंचचे आप्पासाहेब पाटील,जतीन पोतदार,राजु कोंनूर,अमित बियाणी,बाळु भंडारी,अमित पटवा,सचिन खामकर,अभिजित पटवा उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post