मिरजेतील प्राथमिक आरोग्य केंद्रास वॉटर प्युरिफायर व २५ खुर्च्या प्रदान ....... मा. चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्त भाजप हितचिंतकांचा स्तुत्य उपक्रम ......



धनंजय हलकर (शिंदे)

मिरज : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप हितचिंतक कार्यकर्त्यांनी मिरजेतील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास वॉटर प्युरिफायर आणि २५ खुर्च्या देऊन एक स्तुत्य उपक्रम केला. शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ९ येथे सध्या कोव्हीड लसीकरण काम जोमाने सुरु आहे. लसीकरण करून घे न्यासाठी येथे दररोज नागरिकांची गर्दी होत असते. यामध्ये वृद्ध, महिला, अपंग व्यक्ती यांचा समावेश असतो. या आरोग्य केंद्रावर नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर व ज्येष्ठ/वृद्ध/अपंग नागरिकांना बसण्यासाठी २५ खुर्च्यांची गरज होती. हि गरज लक्षात घेऊन भाजपचे हितचिंतक विटा डेअरी फर्मचे मालक चंद्रशेखर कुलकर्णी व कांचन इंटरप्रायझेसचे चालक मंदार परांजपे यांनी मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वॉटर प्युरिफायर व २५ खुर्च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा खरात यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दिपकबाबा शिंदे-म्हैसाळकर, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, भाजप अनुसूचित मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, नगरसेविका सौ. अनिता वनखंडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, नगरसेवक निरंजन आवटी, शहर अध्यक्ष राजेंद्र नातू, महेश चिप्पलकट्टी, विटा डेअरीचे चंद्रशेखर कुलकर्णी,  संदीप सलगर, असलम कलावंत, अभिजित लाड, शीतल पाटोळे, महेश फोंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post