दत्तवाड येथील एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

 


दत्तवाड : युनुस लाडखान : 

दत्तवाड (तालुका शिरोळ) येथील एका शेतकऱ्यावर शेता मधील रस्त्याच्या वादातून जीव घेणा हल्ला करण्यात आला.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की दत्तवाड येथील शेतकरी कुंदनसिंग जयसिंग रजपुत (वय ४८) रा- दत्तवाड व हल्ला करणारी सदरची व्यक्ती ही एकाच गावचे राहणारे असून त्यांची शेतजमीन एकमेकांच्या शेजारी असून सदर शेतात जाणे-येणे च्या रोड वरून वाद विवाद पूर्वी झाला होता. त्याबाबत न्यायालयात दावा फिर्यादी यांच्या बाजूने लागला आहे. यातील कुंदनसिंह रजपुत हे सदरच्या रोडणे सायकलवरून बोरची मोटर आणण्यासाठी मागील आठवड्यात गेले होते. त्यानंतर सदर रस्त्यावरून राजपूत येथे पायी चालत जात असताना याचा राग मनात धरून तू सायकल आणायची नाही पायी चालत शेतात जायचे असे म्हणून त्या व्यक्तीने राजपूत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सदर घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास बीट अंमलदार अनिल चव्हाण करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post