१५ जून रोजी महाराष्ट्रातील 70000 आशा व ३७०० गटप्रवर्तक संपाची जोरदार तयारी आरोग्यमंत्री श्री राजेंद्र टोपे यांनी १० जून रोजी संघटना प्रतिनिधी यांच्या बरोबर चर्चा करूनही संपाबाबत तोडगा निघाला नाही





हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                

महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना Aituc.१५ जून रोजी महाराष्ट्रातील 70000 आशा व ३७०० गटप्रवर्तक संपाची जोरदार तयारी! 

   महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समिती बरोबर दोन वेळेस आरोग्य मंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी यांच्याशी बैठका होऊनही अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. पहिली बैठक 4 जून रोजी मुंबई आरोग्य भवन येथे झाली व दुसरी बैठक मंत्रालयामध्ये आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्याबरोबर कामगार संघटनांच्या प्रतिनिधीसह  बैठक झाली. परंतु अजूनही तोडगा निघालेला नाही. 

दरम्यान दहा जूनच्या बैठकीमध्ये आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी आश्वासन दिले कि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तातडीने चर्चा करून संपाबाबत तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले.दोन्ही बैठकीमध्ये कामगार संघटनांच्या वतीने कॉ M A पाटील कॉ राजू देसले, कॉ शंकर पुजारी, कॉ श्रीमंत घोडके कॉ आरमायटी इराणी, कॉ राजेंद्र साठे इत्यादींनी सहभाग घेतला.

मागील दीड वर्षापासून देशातील आशा व गटप्रवर्तक महिला इतर आरोग्य आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांच्यासह स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वर जास्तीत जास्त काम लादलेले असून रविवार सह दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे. अनेक आशा महिला कोविंड १९ ने बाधित झाल्या. अनेक यामुळें अनेक आशा महिलांचा मृत्यू झाला. परंतु त्या सर्वांना अजूनही 50 लाखाची विमा रक्कम मिळालेली नाही. इतकेच नव्हे तर आजही अशांना प्राधान्याने त्यांचे कुटुंबीय बाधित असल्यास हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. व मोफत औषध उपचार मिळत नाहीत. तसेच त्यांच्या कुटुंबांना विम्याची तरतूद केली नाही. असा अन्याय सुरू असल्यामुळे या सर्व 70 हजार महिला सध्या शासनाच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आहेत. 

   covid-19 चे काम करीत असलेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांना त्या कामाचा दररोज पाचशे रुपये स्वतंत्र प्रोत्साहन भत्ता मोबदला मिळाला पाहिजे. न मिळाल्यास 15/6/2021 तारखेस राज्यातील 70 हजार आशा व गटप्रवर्तक महिला लाक्षणिक संपाची नोटीस देण्याचे संपूर्ण राज्यामध्ये सुरू असून आशा व गटप्रवर्तक महिला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्राथमिक आरोग्य केंद्र ,खासदार, आमदार ,जिल्हा परिषद पदाधिकारी यांना निवेदन देत आहेत.

 एक दिवस लाक्षणिक संप केल्यानंतर 16 जून पासून आशा व गटप्रवर्तक महिला कोविड19 विषयक सर्व कामावर बहिष्कार टाकतील!  रॅपिड एंटीजन टेस्ट संदर्भात भारत सरकारने ते काम आशा महिलांच्या कडून करून घेऊ नये असे शासनास व NHM ना कळविले होते. तरीसुद्धा केंद्रीय राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आदेश डावलून महाराष्ट्र शासनाने आशांच्यावर जबरदस्ती करून या रॅपिड अंतिजन टेस्ट घेण्याबाबत प्रयत्न केला जात होता. शेवटी आशानी प्रखर विरोध केल्यामुळेच त्यांना तो निर्णय मागे घ्यायला लागून इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना ते काम देण्यात आले आहे. आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्येआशा  महिलांनी जोरदार प्रतिकार केल्यामुळेच हे शक्य झालेले आहे.

 दरम्यान 15 जून लाक्षणिक संपातील मागण्यासंबंधी अजूनही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे 15 जूनच्या लाक्षणिक संपाची जोरदार तयारी करावी आणि 16 पासून covid-19 बहिष्कार बाबतीत तयारी करावी असे आवाहन महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक संघटना कृती समिती यांच्या वतीने करण्यात आलेली आहे . 

यापूर्वी महाराष्ट्र शासनाने आशा  महिलांना जी दरमहा दोन हजार रुपये वाढ  केलेली आहे ती सुद्धा पूर्णपणे दिली जात नाही. त्याच्यामध्ये काटछाट केली जात आहे. सध्या covid-19 महामारी मध्ये आशा महिलांच्या वर सक्तीने काम वाढ लादण्यात आली आहे. त्यांना दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम  करावे लागत आहे. म्हणूनच आशा व गटप्रवर्तक महिलांना सध्या मिळणाऱ्या मोबदल्या शिवाय दररोज covid-19 चा प्रोत्साहन भत्ता म्हणून पाचशे रुपये मिळाला पाहिजे तसेच आशा व गटप्रवर्तक महिलांना ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही जे काम फुकटच करून घेतले जाते असे काम त्यांच्याकडून करून घेता कामा नये अशी मागणी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या करून जोरदारपणे केली जात आहे.

एकूणच आशा व गटप्रवर्तक महिलांच्या प्रमुख मागण्या बाबत महाराष्ट्र शासनाला लाक्षणिक संपाची नोटीस आठ दिवसांपूर्वीच देण्यात आलेली आहे. तरीही लाक्षणिक संप चार दिवसांवर आलेला असूनही याबाबत अद्यापही जोपर्यंत शासन मागण्या मान्य करण्यास तयार नाही. म्हणुनच 15 जून चा संप आशा व गटप्रवर्तक महिलांनी जोरदारपणे यशस्वी करावा असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. असे पत्रक कॉ सुमन शंकर पुजारी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे

Post a Comment

Previous Post Next Post