इचलकरंजी शहरातील कष्टकरी कामगार वर्गावर करत असलेली कारवाई ताबडतोब थांबवावी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मागणी.



  हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                                                                                                                                                                                         

इचलकरंजी कामगार संघटना संयुक्त कृती समिती इचलकरंजी शहर यांच्या वतीने आज इचलकरंजी शहर वाहतूक शाखा यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की इचलकरंजी शहरातील कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या संख्येने असून हा कामगार विविध क्षेत्रात काम करत असतो अशा कामगारांना मालक लोकांनी कामावर येण्यासाठी आयडेटी दिली आहे तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना ज्या त्या कामगार संघटनांनी संघटनेची आयडी दिली आहे  अशा कामगारांना शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांनी न अडवता त्या कामगारांना सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते काॅ दत्ता माने भरमा कांबळे शामराव कुलकर्णी राजेंद्र निकम मदन मुरगूडे आनंदा गुरव हणमंत लोहार इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post