देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट आणखी भयानक , भूक कमी होणे, पोटदुखी, उलटय़ा, अशक्तपणा, गुडघेदुखी ही नवी लक्षणेही पुढे आली आहेतदेशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट आणखी भयानक बनली आहे. बुधवारी 24 तासांत कोरोनाच्या 1 लाख 15 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. पहिल्या लाटेतील विक्रमी संख्येपेक्षा हा आकडा अधिक आहे. याचवेळी भूक कमी होणे, पोटदुखी, उलटय़ा, अशक्तपणा, गुडघेदुखी ही नवी लक्षणेही पुढे आली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने संपूर्ण देशाची चिंता भलतीच वाढवली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) निरीक्षणानुसार वेगवेगळ्या कोरोनाग्रस्तांमध्ये विषाणूची नवनवीन लक्षणे आढळत आहेत. अनेकांना संसर्ग झाल्यानंतर त्रास वाढत आहे. हे लोक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ठीक होत आहेत.सर्वसाधारणतः कोणतीही व्यक्ती विषाणूने बाधित झाल्यानंतर पुढील 5 ते 6 दिवसांनी संबंधित व्यक्तीमध्ये विषाणूची लक्षणे दिसत आहेत. काही रुग्णांमध्ये 14 दिवसांनंतर कोरोनाची लक्षणे समोर येत आहेत. देशातील बहुतांश नवीन रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच दिसलेली नाहीत. काही जणांमध्ये सौम्य आणि तीव्र (माईल्ड आणि मॉडरेट) बनू शकणारी लक्षणे आहेत. विषाणूमध्ये ज्या गतीने बदल होत आहे, तसतसा विषाणूच्या गंभीरतेचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे.

गॅस्ट्रोइन्टेस्टायनलची लक्षणे काय आहेत?

अनेक कोरोनाग्रस्तांना गॅस्ट्रोइन्टेस्टायनलचाही त्रास सुरू झाला आहे. विषाणूच्या दुसऱया लाटेत तुलनेत अधिक रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टायनलची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाचा नवीन स्ट्रेन पचनक्षमतेवर आघात करीत आहे. त्यामुळे अतिसार, पोटदुखी, मळमळ, उलटी ही नवीन लक्षणे असलेले रुग्ण अधिक आढळताहेत.

ही आहेत नवीन लक्षणे…

पोटदुखी, मळमळ, उलटी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक कमी होणे, गुडघेदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यांना हलकीशी सूज व डोळ्यांतून पाणी येणे.

तज्ञांचे म्हणणे काय?

  • प्रत्येक विषाणू म्युटेट असतो व त्याचे नवीन व्हेरिएंट्स समोर येतात. कोरोनाच्या बाबतीत हेच घडत आहे. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स आढळत आहेत. लंडन आणि ब्राझीलमधून आलेले काही स्ट्रेन गंभीर आहेत. हे स्ट्रेन झपाटय़ाने फैलावत आहेत, असे वेल्लोरच्या क्रिश्चियन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कंग यांनी म्हटले आहे.
  • शरीरात जसजसा विषाणू शिरकाव करीत आहे, तसतसा तो शरीराच्या इतर अवयवांवरही आघात करीत आहे. त्यामुळे हयगय करून चालणार नाही. कोणतेही लक्षण दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करा आणि वेळीच उपचार घ्या, असा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

Post a comment

0 Comments