हातकणंगले तालुक्यातील तारदाळ - निमशिरगाव रस्त्यालगत असणाऱ्या श्री शिरकाई देवी कोडी देवस्थान कडे जाणाऱ्या मार्गावर काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने या रस्त्याचे उद्घाटन .

 *तारदाळ येथील शिरकाई कोडी देवस्थान कडे जाणार्‍या रस्त्याचे काम पुर्ण*       *मान्यवरांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन*           हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

           




हातकणंगले तालुक्यातील तारदाळ - निमशिरगाव रस्त्यालगत असणाऱ्या श्री शिरकाई देवी कोडी देवस्थान कडे जाणाऱ्या मार्गावर काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने या रस्त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे , सरपंच यशवंत वाणी , उपसरपंच सुधाकर कदम यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

    तारदाळ येथील कोडी शिरकाई देवी देवस्थान कडे जाण्यासाठी भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.याची दखल घेऊन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी २५/१५ फंडातून निधी मंजूर केला होता . परंतू कोरोणामुळे  या कामाकडे दुर्लक्ष झाले होते . याचा  जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे  यांनी पाठपुरावा केल्याने  या रस्त्याचे काँक्रीटीकरण  पूर्ण झाले आहे. सदर रस्त्यासाठी स्थानिक शेतकर्‍यानी मोलाचे सहकार्य केले . त्यामुळे भाविकातून समाधान व्यक्त होत आहे . सदर उद्घाटन प्रसंगी पंचगंगा साखर कारखाना चे संचालक प्रकाश खोबरे , सचिन पवार , चंद्रकांत तांबवे , मृत्यूंजय पाटील , शिवप्रसाद पाटील ,तंटामुक्त अध्यक्ष सावंता माने , रामचंद्र कोळी , सतिश नर्मदे , अशोक गायकवाड , बाबासो महाजन ,विकास बन्ने , कुमार चौगुले , भिमराव बन्ने आदिंसह भाविक उपस्तीत होते

Post a Comment

Previous Post Next Post