भारती विद्यापीठ आयएमईडीला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे लीलावती पारितोषिक



पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिनरशिप डेव्हलमेंट(आय एम ई डी) या संस्थेच्या डिजिटल लिटरसी टीमला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे पहिले लीलावती पारितोषिक नुकतेच दिल्लीत प्रदान करण्यात आले. या टीमच्या प्रमुख डॉ. कीर्ती गुप्ता यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते हे पारितोषिक स्वीकारले.एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. कीर्ती गुप्ता यांच्या समवेत श्वेता ताटे, डॉ. रजिता दीक्षित, डॉ. अनुराधा येसुगडे, डॉ. हेमा मिरजी, पल्लवी चोपडे यांनी डिजिटल लिटरसी टीममध्ये काम केले.

या स्पर्धेसाठी देशभरातून ४9६ प्रवेशिका आल्या होत्या .या यशाबद्दल भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार आणि आय एम ई डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर  यांनी सर्वांचे अभिनंदन केले.अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया, एसटीडीसीचे संचालक डॉ. अमित कुमार श्रीवास्तव, सहसंचालक संजू चौधरी, सदस्य राजीव कुमार उपस्थित होते.                                                                                                                                                

Post a Comment

Previous Post Next Post