लॉकडाऊनचा लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला नसून प्रत्येक जिल्ह्यात लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणारणी करावी, विद्युत शवदाहिनी उभारून ती कार्यान्वित करावी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्यात यावे आदी निर्णय घेण्यात आले

 


 महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. यावर नियंत्रण आणण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सचीही बैठक घेतली. त्यात लॉकडाऊन लावला जाईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र लॉकडाऊनचा लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला नसून प्रत्येक जिल्ह्यात लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणारणी करावी, विद्युत शवदाहिनी उभारून ती कार्यान्वित करावी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्यात यावे आदी निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.डॉ. टोपे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर साधारणपणे लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकान्याय यावा, असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांचा ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. त्यामुळे दररोज पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यावर तातडीने निर्णय होईल.

या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. झहीर उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय यांनी उपस्थिती लावली होती.तसेच अंत्यसंस्कारच्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबतही चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. अनावश्यक वापरण्यावर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर सरकारी रुग्णालयाला थेट कंपनीकडून इंजेक्शन दिलं जाईल. त्यांची रेट कॅपिंगही केली जाईल. हे इंजेक्शन 1400 रुपयांवर दिले जाणार नाही. काल मी याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर आज सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं निर्यात केलं जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक पार पडली. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा करण्यात आली. जवळपास दोन तासांपासून ही बैठक सुरु होती. बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. तसेच यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.


Post a comment

0 Comments