मराठा महासंघातर्फे मसाला प्रशिक्षण शिबिर महिलांना सक्षम बनविणे हे ध्येयअखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी व उजळाईवाडी महिला बचत गट यांच्या वतीने महिलांना मसाला प्रशिक्षण शिबिर,उजळाईवाडी,कोल्हापूर येथे आयोजित केले यावेळी मसाल्याचे पावभाजी, सांबर, चॅट,इ.प्रकार व कोरट्याची, मिरची, लसूण, शेंगदाणा  इ. प्रकारच्या चटणी कशी बनवावयाची, त्यासाठी त्यातील प्रमाण याची प्रात्यक्षिक सह माहिती देवून पॅकिंग करून मसाल्यांना बाजारपेठ कशी उपलब्ध करावी याविषयी मार्गदर्शन सौरभ वायंगणकर व सहकारी यांनी केले यावेळीजिल्हा  महिलाध्यक्षा सौ शैलजा भोसले यांनी  महिलांना त्यांच्या  पायावर उभे करणारे उपक्रम राबविले जातील सांगितले.

Post a comment

0 Comments