किसान क्रेडिट कार्डचे वाटप करा-पगारे.येवला प्रतिनिधी एकनाथ भालेराव

येवला :  शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तीन लाखपर्यंत कर्ज देणायसाठी 6 फेब्रुवारी 2020 ला केंद्रीय कृषी विभागाचे परिपत्रक काढले आहे एकवर्षं उलटूनही राष्ट्रीकृत व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप केले नाही त्यामुळे अर्थविभागाने या बँकांना कार्ड वाटप करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सामजिक कार्यकर्ते प्रथमेश पगारे यांनी केली आहे

         कोरणामुळे शेतकरी संकटात असतांना बँकेकडून शेतकऱ्यांना शासन निर्णयाची व शेतीविषयक योजनांची माहिती देणायस बँकाचे अधिकारी टाळाटाळ करतात शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोचविण्यासविलंब होतो शेतकरी शासनाच्या विविध योजनापासून वंचित राहतो आहेत केंद्रीय कृषी उपसचिव डॉ.आशिषकुमार भुतानिया यांनी 6 फेब्रुवारी 2020 ला याबाबत परिपत्रक काढले होते मात्र आतापर्यंत राष्ट्रीकृत व सहकारी बँकांनी या परिपत्रकाची कोणत्याही प्रकारची दखल न घेता केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनेपासून शेतकऱ्यांना वंचीत ठेवले आहे अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजने अंतर्गत तीन लाखापर्यंत कर्ज मिळावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज संबंधित विभागाकडे दाखल केले आहे त संबंधित बँका अधिकाऱ्यांना उदासीन धोरणामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजना बारगळन्याची शक्यता आहे त्यासाठी प्रशासनाने केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या सदर परिपत्रकाची दखल घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश पगारे यांनी केली आहे 

माझ्या शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा व सर्व बँकांनी शेतकऱ्यांना किसान कार्ड उपलब्ध करून द्यावी

प्रथमेश पगारे

सामाजिक कार्यकर्ते, येवला.

Post a comment

0 Comments