भरदिवसा जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविणाऱ्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेपुणे :  भरदिवसा जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविणाऱ्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्याकडून ८७ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विशाल अनिल भांडे (१९) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ७७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे .

ही महिला पतीसह मुलीला भेटण्यासाठी २८ मार्चला दुपारी बाराच्या सुमारास महेश सोसायटी परिसरातून रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी राजेश उसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल शितोळे व राहुल कोठावळे यांनी घटनास्थळावरील व बिबवेवाडी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.दरम्यान, महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची माहिती पोलीस अंमलदार अमित पुजारी आणि तानाजी सागर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विशालला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश चंद्रकांत उसगांवकर शाम लोहोमकर , अमित पुजारी , तानाजी सागर , सतिश मोरे , श्रीकांत कुलकर्णी , अमोल शितोळे , राहुल कोठावळे , अतुल महागडे व ज्ञानेश्वर डाके यांच्या पथकाने केली.

Post a comment

0 Comments