दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी ,. पुणेकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करण्याचे पोलिस प्रशासनाने केले आवाहन

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात पुन्हा शनिवारी (3) संध्याकाळी सहावाजेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडीकल, दवाखाने सुरू राहणार असून, उर्वरित सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांमधून संचार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यांत कोरोनाचा धोका टळला नसून दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालून नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरात जमावबंदी व संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार चार हजारांवर पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात येणार आहे. विनाकारण मोटारीसह दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नियमांची अमंलबजावणी करण्यासाठी रिक्षा आणि कॅबची सेवाही संध्याकाळी सहानंतर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळण्यासर भर द्यावा. रिक्षाचालकांसह कॅबधारकांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाच्या नियमांची अमलंबजावणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पोलिसांनाही सहकार्य करणे गरजेचे आहे. विनाकारण भटकंती, विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Post a comment

0 Comments