तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला



 पुणे- विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेले विकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध यावर समाधानी असलेले पुण्यातील व्यापारी महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे मात्र खवळले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केवळ शुक्रवार शनिवार च नाही तर आठवड्यातील सर्वच दिवस अनेक दुकाने बंद ठेवण्याचे .. लॉक डाऊनच समजले जाईल असे आदेश काढल्याने पुणेकर संभ्रमात पडले. लोकांत असंतोष व्यक्त होऊ लागला आणि रोज त्यांच्या आदेशात नव नवे समावेश केले गेले. पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या आंदोलनानंतर जर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठकीत आयोजित करण्यात आली. त्यावेळी बैठकीत निर्णय घेतला आहे. रांका म्हणाले, आज पुणे व्यापारी वर्गाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्यात उग्र भावना व्यक्त करण्यात आल्या. या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेेेेेतला आहे. यात गुरुवारी(दि. ७) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे दहावाजता दुुकाने उघडतील आणि सायंकाळी ६ वाजता बंद करतील. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे. मात्र या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले.

रांका पुढे म्हणाले, तसेच या आंदोलनावेळी व्यापारी वर्गाने राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासन यंत्रणेने जाहीर केलेल्या कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत्याचप्रमाणे सरकारने जर आपला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून सर्व दुकाने नियमित सुरु करण्यात येतील.

व्यापारी महासंघाच्या सूचना -

 दि, ८एप्रिल रोजी लॉक डाऊन ला विरोध दर्शविण्यासाठी सूचना__

#. सकाळी ९,३० वाजता प्रत्येक असोसिएशन च्या फक्त 2 पदाधिकाऱ्यांनी बॅनर्स व काळी रिबन्स रांका ज्वेलर्स येथून
कल्लेक्ट करावीत.
जमावबंदी लागू असल्याने कोणी ही घोळका करून तिथे उभे राहू नये.
कारवाई झाल्यास व्यापारी महा संघ जबाबदार राहणार नाही.

प्रत्येकाने पांढरा शर्ट / टी शर्ट/ कुर्ता घालूनच यावे.

. सकाळी ११वाजता प्रत्येक संघटनेला ठरवून दिलेल्या जागेवर किमान ६ फूट अंतर ठेवून सोशल दिस्टांसिंग चे पालन करीत आपल्या सदस्यांना उभे करून घ्यावे, मास्क योग्य प्रकारे घातलेले आहेत याची काळजी घ्यावी.१२ वाजता समारोप झाल्यानंतर शांततेने आप आपल्या घरी जावे.

रस्त्याच्या दोनही बाजूस मेंबर्सना उभे करून घ्यावे, चौक असेल तेथे ब्लॉक करू नये ट्रॅफिक सुरळीत राहण्या करता मोकळी जागा सोडावी.

. सकाळी ११;ते १२ दरम्यान आपण नेमून दिलेल्या जागेवरच उभे रहावे.

ज्या मुळे कुठेही रिकामी जागा दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी.

आपणास दिलेले बॅनर्स योग्य रित्या वाचता येतील असे पकडावेत.

काळ्या रिब्बन्स डाव्या हाताच्या दंडावर बांधाव्यात.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपापल्या संघटनेने करायची आहे.

रिकाम्या बाटल्या गार्बेज बॅग मध्ये टाकाव्यात.

कोणत्याही परिस्थितीत जनतेला त्रास होणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post