अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही. बॉम्ब कुणाच्या सांगण्या वरून ठेवला गेला?, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे , वाझेंनी हे का केलं? किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं, याचा तपास झाला पाहिजे . राज ठाकरे. मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज  पत्रकार परिषद आयोजित केली होते. कोरोना ते परमबीर सिंह पर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. पत्रकारांनी त्यांना अनिल देशमुख या प्रक्रणार प्रश्न विचारताच त्यांनी माध्यमांना थेट उत्तर देत म्हटले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा विषय महत्त्वाचा नाही. बॉम्ब कुणाच्या सांगण्या वरून ठेवला गेला?, याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पोलिसांनी अर्थात वाझेंनी हे का केलं? किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं, याचा तपास झाला पाहिजे .

राज ठाकरे पुढे म्हणाले की, माझी आधीची पत्रकार परिषद ऐकली असेल किंवा तुम्ही त्यात असाल तर तुम्हाला माहित असेल, मी तेव्हाही बोललो होतो की यामागे कोण आहे त्याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे आहे. राज्यातील पोलीस अधिकारे असे वागतात, त्यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मुळात अंबानींच्या घराखाली हा बॉम्ब ठेवण्यास कोणी सांगितला, याचा तपास झाला पाहिजे.

 राज ठाकरेंनी ऐकवला किस्सा

ही परिस्थिती समजावून सांगताना राज ठाकरेंनी एक किस्सा देखील सुनवलं. ते म्हणतात, आमचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांना गाणं गायला प्रचंड आवडतं. मात्र, जेव्हा ते गाण गायला बसतात तेव्हा प्रथम मोठी तान घेतात. ही ताण इतकी मोठी असते की, ते पुढचं गाणं विसरतात. माग त्यांना आठवण करून द्यावी लागते की तुम्ही, हे गाण गात होतात. आताही तसचं झालं आहे. विषय असतो एक आणि लक्ष दुसरीकडेच जात. मग, पुन्हा सांगावं लागतं की बाबा हे सुरु आहे.

या आधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. सचिन वाझे प्रकरण आणि अनिल देशमुख यांनी दिलेलं कथित 100 कोटींचं टार्गेट, या प्रकरणाची चौकशी केंद्राने करावी, राज्यात फटाक्याची माळ लागेल, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याप्रमाणे आता हायकोर्टाने अनिल देशमुख) यांच्या कथित खंडणीची चौकशी सीबीआयकडे () सोपवली आहे. इतकंच नाही तर या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Post a comment

0 Comments