फक्त लॉकडाऊन हा एकमात्र पर्याय नाही .. केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांचे मत




मुंबई :  विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केले आहे. त्यात लोकांमध्ये अजूनही गांभीर्य दिसुत येत नाही आहे. लोक अजूनही मास्क वापरत नाही आहेत त्याचप्रमाणे सोशल डिस्टनसिंग चा सुद्धा फज्जा उडवला जातो आहे. अश्या या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. पण लॉकडाऊन हा एकमात्र पर्याय असू शकतो का ? 

मागील वर्षी म्हणजेच २०२० या वर्षात महाराष्ट्र सरकारनं कडक लॉकडाऊन केलं होतं. त्यात कोरोनावर नियंत्रण ही करण्यात आलं होतं. वर्षभरात कोव्हिडं लसीचे सुद्धा संशोधन करण्यात आलं. पण एवढं करूनही या वर्षी म्हणजेच २०२१ ला पुन्हा कोरोना हा दुपटीने वाढतोय. आता पुन्हा कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. या मधून नेमकं काय साध्य होतंय. लॉकडाऊन करून कोरोना पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो का ? उत्तर हे निश्चितच नाही असंच आहे.

या लॉकडाऊन मुळे कोरोना नियंत्रणात येऊ शकतो पण संपुष्टात नाही. त्यात वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे अगदी सर्वजण भरडले जातायत. महाराष्ट्र हळूहळू बेरोजगारी व गरिबीकडे वळत चालला आहे. यावर  तात्काळ पर्याय निवडणं गरजेचं आहे त्यासाठी कश्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो या बद्दलचे आपले मत हे केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी मांडले आहे. संदिप कसालकर यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन न करता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील प्रत्येक विभागात प्रभाग निहाय आरोग्य केंद्र उभारून त्या प्रभागात राहणाऱ्या संपूर्ण रहिवाश्यांची आरोग्य चाचणी करावी तसेच जर त्या मधील कोन कोरोना संक्रमित आढळला तर त्याला गृह विलगिकरण करावे अन्यथा योग्य तो पर्याय निवडावा आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या त्या आरोग्य केंद्रावर असेल असे घोषित करावे. त्याचप्रमाणे कोरोना संक्रमित राहिवाश्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याचीही काळजी घ्यावी. तसेच प्रभाग पूर्णपणे सुरक्षित असल्यास त्याची खातरजमा करून तो प्रभाग सुरक्षित असे घोषित करावे.

निश्चितच या मध्ये मनुष्यबळाचा तुटवडा हा भासणारच यासाठी सुद्धा पर्याय म्हणून जे कोव्हिडं मुळे बेरोजगार लोकं आहेत त्यांना या कामात रुजू करून रोजगार उपलब्ध करून द्यावा. सोबत लोकसेवेत अग्रेसर असणाऱ्या संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, यांची मदत घेऊन नियोजन करावे.

अश्याप्रकारे अजून या मध्ये समायोजन करून लॉकडाऊन न करता कोरोनावर वर नियंत्रण ठेवता येऊ शकते असे केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post