मिरज येथील निरो हाॕस्पिटलच्या बांधकामावर अपघात मृत्यू पावलेल्या कामगारांला नुकसान भरपाईची निवारा बांधकाम कामगार संघटनेची मागणी.



हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.

  तारीख 30 मार्च 2021 रोजी मिरज येथील समर्थ निरो हॉस्पिटल मध्ये चालू असलेल्या बांधकामावर सकाळीं 10 वाजता अपघात होऊन मृत्यू पावलेल्या बांधकाम कामगारास नुकसान भरपाई मिळून डॉक्टर रवींद्र पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन सांगली निवासी डीएसपी व सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले.

  30/3/2021रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या हॉस्पिटल च्या चौथ्या मजल्यावरून संगमेश्वर शर्मा वय 20 वर्षे कामगार राहणार पूर्णिया जिल्हा बिहार या कामगाराचा मृत्यू झालेला आहे. सोमेश्वर शर्मा हा कामगार डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या हॉस्पिटल च्या चौथ्या मजल्यावर काम करीत होता चौथ्या मजल्यावर काम करीत असताना मालकांनी जाळी लावलेली नव्हती अन्यथा हा अपघात झाला नसता व शर्मा या कामगाराचा मृत्यू झाला नसता.अपघात झाल्यानंतर सोमेश्वर शर्मा बिल्डिंग खालीच दीड तास तसाच पडून होता पडल्यानंतर तो जिवंत होता तरीही त्याला डॉक्टर रवींद्र पाटील यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेऊन उपचार केले नाहीत. त्याऐवजी या कामगारास भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. अशाप्रकारे रविंद्र पाटील यांनी रीतसर बांधकाम परवाना घेणे, बांधकाम कामगार कायदा खाली प्रमाणपत्र घेणे, सुरक्षा साधनांचा वापर करणे या कशाचाही वापर न करता बेकायदेशीरपणे बांधकाम करीत असताना या कामगारांचा बळी घेतलेला आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर रवींद्र पाटील यांनी इमारत बांधत असताना कामगारांच्या साठी आवश्यक सुरक्षा साधने(हेल्मेट, कमरपट्टा, सुरक्षा कोट, जाळी व बूट) या कामगारास पुरवली नाहीत. तसेच या बांधकामाबद्दल बांधकाम कामगार कायदा खाली प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यामुळे अनाधीकृतपणे  बांधकाम करीत असताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने या कामगाराचा मृत्यू झालेला आहे. म्हणून या मृत्यूस डॉक्टर रवींद्र पाटील व इमारत बांधणारे कंत्राटदार जबाबदार आहेत. म्हणून डॉक्टर रवींद्र पाटील यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच बांधकाम कामगार श्री संगमेश्वर शर्मा यांच्या वारसांना कामगार नुकसान भरपाई कायद्याखाली  किमान वीस लाख रुपये नुकसानभरपाई त्वरित देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करावा अशा मागण्यांचे निवेदन होम डीसपी श्री किशोर काळे यांना देण्यात आले. त्यानी शिष्टमंडळास असे सांगितले की या गंभीर अपघाताबद्दल गुन्हा नक्की दाखल होईल लवकरच आपल्याला तपशील समजेल. यानंतर सांगलीचे सरकारी कामगार अधिकारी जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले त्यांनी सांगितले की सहायक कामगार आयुक्त यांच्या आदेशानुसार हॉस्पिटल चे बांधकाम उद्यापासून थांबूवून पुढील कार्यवाही करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदारांनाहीनिवेदन  देण्यात आले.

शिष्टमंडळामध्येकॉ शंकर पुजारी, श्री शिवाजी त्रिमुखे संविधान गौरव समिती एडवोकेट किरण कांबळे राष्ट्रसेवा दल, एडवोकेट अमित कांबळे सम्यक विद्यार्थी आंदोलन,अमित शिंदे सामाजिक कार्यकर्ते,कॉम्रेड विजय बचाटे निवारा बांधकाम कामगार संघटना, व सुभाष काकडे इत्यादींचा समावेश होता. असे पत्रक कॉ शंकर पुजारी अध्यक्ष 

निवारा बांधकाम कामगार संघटना यांनी शिष्टमंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post