निपाणी तहशिलदार प्रकाश गायकवाड यांनी जयंती ला विरोध केल्याबद्दल दलित ‌समाजाचा निषेध

बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : विक्रम शिंगाडे.

     निपाणी येथे मा. तहसीलदार यांनी निपाणी भागातील सर्व दलित पुढाऱ्यांना व कार्यकर्ते यांना बोलावून घेऊन जयंती ची मिटींग घेन्याचे आयोजन निपाणी आय. बी. येथे केले होते. त्यावेळी निपाणी च्या परिसरातील सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते मिटींग साठी हजर झाले होते. त्यावेळी मा. तहसीलदार यांनी कोरोना संदर्भात सरकारी कडक नियम असल्यामुळे आम्ही तुम्हाला मिरवणूक काढु देनार नाही. असे म्हनाले. मग आंबेडकरी चळवळीचे नेते तहशिलदार यांना प्रश्नाचे भडीमार करून राजकीय कार्यक्रम दोन- तीन हजार लोक घेऊन करत आहेत. बेळगाव आणि निपाणी मध्ये नुकतेच निवडणूक प्रक्रिया हजारोंच्या संख्येने नेत्यांना घेऊन काढन्यास परमिशन मिळते.     महाशिवरात्रीच्या वेळी  मोठ्या प्रमाणात लोकसंख्या गोळा करून महाशिवरात्री साजरी करायला चालते. असे अनेक प्रश्न तहशिलदांरावर केले. मग विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करन्यासच तुम्ही का..कडक निर्बंध लावत आहात. असे अनेक प्रश्न तहशिलदांराना विचारन्यात आले. त्यावेळी तहशिलदार गायकवाड यांनी उत्तर न देता पळवाट काढून निघुन गेले. त्यावेळी निपाणी पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक तळवार साहेब हे सुद्धा होते. मात्र तहशिलदार यांनी नेत्यांना बोलाऊन अर्धांत ऊठुन गेले. त्यामुळे  दलित समाजाचा अपमान  झाला. म्हनुन‌ त्यांच्या  विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर उभे राहून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करन्यात आली. व त्यांची बदली करावी अशी सुध्दा  घोषणा झाली. त्यावेळी अनेक संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a comment

0 Comments