आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीचे अनुषंगाने उप विभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या सुचनेनुसार इचलकरंजी शहर सनियंत्रण समितीची बैठक संपन्न इचलकरंजी :    आज दि.६ एप्रिल रोजी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रश्नी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीचे अनुषंगाने उप विभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या सुचनेनुसार इचलकरंजी शहर सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकी मध्येस सद्यस्थितीतशासन निर्णयानुसार मा.जिल्हाधिकारी सो.यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासना कडून करणेत येणार असल्याने शहरातील सर्व नागरिकांनी सदर आदेशाचे पालन तंतोतंत करावे असे आवाहन नगरपरिषदेकडून करणेत येत आहे , जेणेकरून इचलकरंजी शहरामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यास नागरिकांचे सहकार्य मिळेल तसेच या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून होणारी कटु कारवाई टाळणेस   मदत होईल.

त्याचबरोबर मा. जिल्हाधिकारी यांचा आदेश सर्व शहरवासीयां पर्यंत पोहचण्यासाठी आणि शहरातील ४५  वर्षी वरिल सर्व नागरिकांना लस घेणेच्या दृष्टीने नागरिकांची जनजागृती आणि प्रबोधन होणेसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणेत येणार आहेत याकरिता याबाबतचे आवाहन घंटा गाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग समितीच्या माध्यमातून देखील नगरपरिषदेच्या वतीने यासाठी विशेष प्रयत्न करणेत येणार आहेत.या बैठकीसाठी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री 

गायकवाड, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस उप अधिक्षक बाबुराव महामुनी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्य अधिकारी शरद पाटील, पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे,आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सागर चाळके,अजित जाधव,शशांक बावचकर , प्रकाश मोरबाळे, सुनिल पाटील,राहुल खंजीरे,किसन शिंदे, अब्राहम आवळे, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार,विकास अडसूळ, आय.जी.एम.वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश महाडिक,आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

        
Post a comment

0 Comments