ढोणेवाडीतील महिलेच विषारी सर्प दंशाने मृत्यू 

हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

कारदगा ...ढोणेवाडी तालुका निपाणी येथील सौ .अनिता बाबासाहेब सादळकर  वय वर्षे ५६ यांचा  शेतात काम करीत असताना  विषारी सापाने दंश केला होता.त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या वंसतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.पण उपचारास प्रतिसाद मिळाला नसल्याने   गुरुवारी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अनिता सादळकर ह्या एक कष्टाळू महिला होत्या त्यांच्यावर ओढवलेल्या या घटनेमुळे ढोणेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

        याबाबत  अधिक माहिती अशी कि,अनिता सादळकर ह्या शनिवार  दि.२०मार्च रोजी  पठार परिसरातील स्वतःच्या शेतामध्ये काही महिला मजूराना घेवुन ऊसाची भांगलणीसाठी गेल्या होत्या.ऊसाच्या सरीत बसुन तण काढीत असताना पाठीमागून विषारी सापाने दंश केला .काहीतरी टोचले म्हणून हातातील खुरपे  मागे फिरवले  पण पुन्हा सापाने दंश केला.मागे फिरून पाहिले तर साप होता. तातडीने अनिता सादळकर यांनी साप चावल्याची माहिती घरात सांगितल्या नंतर सांगली सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे बारा दिवस उपचार केले पण विष किडनी ल रक्तात मिसळल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गुरुवारी त्यांची प्राण ज्योत मावळली.त्या एक कष्टाळु महिला होत्या. त्यांचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने सादळकर कुटुंब उघड्यावर पडले आहे .तहसीलदार निपाणी ,महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी शासनाच्या आपत्ती निवारण निधी मधुन त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे.

Post a comment

0 Comments