तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग निधी वाटप

 हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                 

हातकणंगले :   सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे यांनी दिव्यांग बांधवाना दिव्यांग निधी मिळावा म्हणून तारदाळ ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता.त्यावेळी तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांनी शब्द दिल्याप्रमाणे आज 

 हातकणंगले  तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यागं निधीचे वाटप करण्यात आले. पाठपुराव्यायाला यश मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर  समाधान दिसून  आले.  तारदाळमध्ये एकूण 90 दिव्यागं बांधव नोंदणीकृत असून आज   2021 साल चे ग्रामपंचायत निधीतील 5%राखीव निधीचे प्रत्येकी दोन हजार चा धनादेश देण्यात आला तसेच भविष्यात अपंग बांधवांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबण्यात येणार असल्याचे सरपंच यशवंत वाणी यांनी यावेळी  सांगितले सदर कार्यक्रमास सरपंच यशवंत वाणी,ग्रा.पं. सद्यस्य सुधाकर कदम,चंद्रकांत तांबवे, ग्रामसेवक कांबळे,पोलीस पाटील संतोष लोहार,क्लार्क शशिकांत कोरवी भाऊसाहेब चौगुले व अपंग बांधव उपस्थित होते

Post a comment

0 Comments