महिला दिनानिमित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माहिलांचा सत्कार आप्पासाहेब भोसले :  हातकणंगले तालुका प्रतिनिधी :


 खोतवाडी (ता हातकंणगले) येथील हनुमान मंदिर परिसरातील क्र218 अंगणवाडी येथे महिला दिन विविध गावातील कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून साजरा करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन माणुसकीच्या सौ स्वाती केर्ले व आरती लाटणे यांच्या हस्ते करण्यात आले

  यावेळी मनोगतात सर्व महिलांनी एकत्र राहून आज महिलांच्या वरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक होणे गरजेचे आहे त्याच बरोबर शिक्षण असो किंवा स्पर्धा परीक्षा असो यासारख्या क्षेत्रात पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केलेया वेळी स्वाती केर्ले,आरती लाटणे,सौ पाटील मॅडम,मेघा खोत,संगीता माने,रेशमा अन्सारी व भागातील इतर महिला उपस्थित होत्या

Post a comment

0 Comments