राज्य सरकारच्या कर्मचाऱयांसह एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळणारमहाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱयांना विविध आजारांच्या उपचारांसाठी करावा लागणाऱया वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. आता या 27 आकस्मिक आजारांत कोविड-19 या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱयांसह एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळणार आहे.

एसटी महामंडळात निकडीच्या परिस्थितीतील आजारांच्या उपचारांसाठी कराव्या लागणाऱया वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची योजना परिपत्रक क्र. 9/87 अन्वये ठरवून दिलेली आहे. महामंडळ ठराव क्र. 51 दि. 20.03.1986 अन्वये महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱयांसाठी लागू केलेली रुग्णालयीन खर्चाची योजना वेळोवेळी दुरुस्त करून राज्य परिवहन कर्मचाऱयांना लागू केली आहे.

एसटीत लसीकरण केव्हा ?

एसटी महामंडळात या कर्मचाऱयांनी मुंबईत लॉकडाऊनमध्ये बेस्टच्या कर्मचाऱयांच्या खांद्याला खांदा लावून अत्यावश्यक सेवा बजावली आहे. बेस्टमध्ये फ्रंट वर्कर्सचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु एसटी महामंडळात 35 हजार चालक तर 38 हजार वाहकांचे लसीकरण करण्याची मागणी करण्यात येत सुमारे एक लाख कर्मचारी आहेत.

Post a comment

0 Comments