गावठी बॉम्ब ने हॉस्पिटल उडवून देण्याचा प्रयत्न , पोलिसांनी हा गावठी बॉम्ब निकामी केला.हातकणंगले तालुका प्रतिनिधी : अप्पासाहेब भोसले.

हातकणंगले : गावठी बॉम्ब ने हॉस्पिटल उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार  जयसिंगपूर शहरात घडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हा गावठी बॉम्ब निकामी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार जिह्यातील जयसिंगूर शहरात एक रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी अज्ञाताने रुग्णालयाच्या परिसरात गावठी बॉम्ब प्लान्ट केला होता. याच परिसरात विस्फोटासाठी लागणारं पुरक साहित्य दोन दिवसांपासून एका गोणीमध्ये पडून होतं.रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.

पोलिसांना बॉम्ब निकामी केला

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना सूत्र हालवले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी गावठी बॉम्ब निकामी केला. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, जयसिंगपूरसारख्या शहरात गावठी बॉम्बच्या मदतीने थेट रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून तापसातून लकवरच या प्रकरणाशी निगडीत बाबी समोर येतील असे सांगितले जात आहे.


Post a comment

0 Comments