खोतवाडी येथे विना मास्क ये- जा करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.          

खोतवाडी तारदाळ रस्त्यावर विना मास्क ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर आज सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.काही वाहन  धारकांचा प्रशासनाबरोबर हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. इचलकरंजी आणि परिसरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे धोक्याची घंटा वाजत आहे.मात्र वाहनधारक प्रशासनाचे नियम अटींना हरताळ फासत बेजबाबदर पणे प्रवास करत आहेत अशा विना मास्क प्रवास करणाऱ्या टू व्हिलर वाहनधारकांवर खोतवाडी ग्रामपंचायत समोर 200 रु.ची पावती करुन दंडात्मक  कारवाई करण्यात आली.ही कारवाई खोतवाडी  ग्रामपंचायत व शहापूर पोलीस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.

Post a comment

0 Comments