हिरो फायनान्सचे पुढे करीत नाव, काही मुलींनी मांडलाय ब्लॅकमेलिंगचा डाव


   शिरोळ : (प्रतिनिधी)       सध्या मार्चअखेर असलेने विविध बँका, वित्तीय संस्था आणि फायनान्स कंपण्या यांनी कर्ज वसुलीचा धडाकाच लावला आहे. पण याच संधीचा फायदा घेत गोड गळा असणाऱ्या काही मुलींनी मात्र कोणत्याही फायनान्स कंपनीचे नाव घ्यायचे आणि ग्राहकांशी उद्धट भाषेत बोलत त्यांची लायकी काढत रक्कम भरण्यासाठी मोबाइल फोनवरून मानसिक त्रास देण्याचा उद्योग चालविला आहे. असाच प्रकार शिरोळ तालुक्यातील एका ग्राहकासोबत झाला. हिरो फायनान्स या कंपनीचे नाव पुढे करीत काही मुलींनी कर्ज भरण्यासंदर्भात तगादा त्या ग्राहकाला लावला. सर्व हप्ते भरून सुध्दा अमुक इतका दंड भरावयाचा राहिला आहे.  तुम्ही तो भरून टाका. उद्या किंवा परवा भरतो असे सांगितल्यानंतर - लायकी नसताना कर्ज घेता कशाला? अशा पध्दतीची उद्धट भाषा ग्राहकाला ऐकून घ्यावी लागत आहे. इतकेच नाही तर एक कॉल संपतो न संपतो तोच दुसऱ्या नंबरवरून ग्राहकास पुन्हा दुसऱ्या महिलेकडून तीच विचारणा व त्याचपद्धतीने त्रास. त्यामुळे ग्राहक अक्षरशः वैतागून गेला आहे. शेवटी त्या महिलांकडून सेटलमेंटची भाषा आल्यानंतर ग्राहकाने सेटलमेंट ची रक्कम भरली सुद्धा . मात्र रक्कम भरून ही पुन्हा तुमची अद्याप इतकी रक्कम राहिली आहे ती अमुक तारखेपर्यंत भरायलाच पाहिजे म्हणून पुन्हा त्याच महिलांकडून पुन्हा तसाच त्रास.  म्हणून ग्राहकाने कॉलला दाद देने टाळले असता व्हाट्सएपवरून मॅसेज करून कायदेशीर कारवाई करण्याची धमकी सदर ग्राहकाला दिली जात आहे.  हे एकप्रकारे ग्राहकाला मानसिक त्रास देऊन ब्लॅकमेलिंग करण्याचे रकमा उकळण्यासाठी अवलंबलेली पद्धतच दिसत आहे . त्यामुळे आमचे सर्व नागरिकांना आवाहन आहे की  9096780229  व  9284987389 या नंबरवरून आपणासही कॉल आल्यास सावध व्हा व त्यांचे व तुमच्यातील कॉल रेकॉर्डिंग करून आम्हास पाठवा. किंवा आमच्या नजीकच्या प्रतिनिधीशी सम्पर्क साधा.

Post a comment

0 Comments