शिरोळ : साप्ताहिक वार्ता सुखचा दुसरा वर्धापन दिन तेरा मार्च रोजीशिरोळ : येथील प्रसिध्द साप्ताहिक वार्ता सुख या वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दीन शनिवार दिनांक १३.०३.२०२१ रोजी शिरोळ येथील नाना कॉम्प्लेक्स येथे दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. असे वार्ता सुख चे संपादक दत्तात्रय खडके यांनी माहिती दिली.

     या समारंभास जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, ज्येष्ठ स्थंब लेखक व बी बजारचा चे शिल्पकार आप्पालाल  चिक्कोडे , शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,  श्री दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील , लिंगायत धर्म महासभेचे राज्य सरचिटणीस बी एस पाटील, प्रेस मीडिया चे संपादक व आदर्श पत्रकार महासंघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मेहबूब सर्जेखान आधी प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार असल्याचेही खडके यांनी सांगितले. मात्र समारंभास येताना प्रत्येकाने मास्क वापरणे, स्यानीटायजरचा वापर करणे असल्याचे नमूद केले आहे.

Post a comment

0 Comments