हरविलेले 15 मोबाईल समर्थ पोलिसांनी पाठपुरावा करून नागरिकांना मिळवून दिले. नागरिकांनी केले पोलिसांचे आभार व्यक्तपुणे : कामाच्या गडबडीत गहाळ झालेले आणि हरविलेले 15 मोबाईल समर्थ पोलिसांनी पाठपुरावा करून नागरिकांना मिळवून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड पोर्टलवर तक्रारींची ऑनलाईन नोंद करण्यात आली होती.

नागरिकांनी ऑनलाईन तक्रार केल्यानंतर पोलिस ठाण्याच्यावतीने संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार गहाळ झालेले मोबाईल महाराष्टासह कर्नाटक राज्याच्या विविध भागात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल वापरकत्र्यांना हद्दीतील संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर संबंधितांना मोबाईल जमा केले होते.समर्थ पोलिस ठाण्यात मोबाईल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तक्रारकत्र्यांना बोलावून मोबाईल परत दिले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.

Post a comment

0 Comments