शहरातील उंड्री परिसरातून सहा परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 69 लाख रुपये किमतीचे कोकेन आणि मॅफेड्रोन जप्त केले . पुणे - पुणे शहरातील उंड्री परिसरातून सहा परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 69 लाख रुपये किमतीचे कोकेन आणि मॅफेड्रोन जप्त केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. मागील चार वर्षापासून हे नागरिक पुणे शहरात रहात आहेत.मनफ्रेंड दाऊद मंडा (वय 30), अनास्ताझिया डेव्हिड (वय 26), हसन अली काशीद (वय 32) बेका हमीस फाऊमी (वय 42) सर्व रा. टांझानिया, शामिम नन्दावूला (वय 30), पर्सि नाईगा (वय 25, दोघेही रा. युगांडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

अमली पदार्थविरोधी पथकाच्या कर्मचारी मनोज साळुंखे यांना पाच ते सहा परदेशी व्यक्ती उंड्री येथील आतूर हिल्स सोसायटीतील रो हाऊसमध्ये राहत असून घरातून चोरून कोकेन मॅफेड्रोन, ड्रग्सची विक्री करत त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उंड्रीतील सदर रो हाऊसमध्ये छापा मारून कारवाई केली.

पोलिसांनी याठिकाणाहून नऊ लाख 57 हजार रुपयांचे 136 ग्रॅम कोकेन , 57 लाख 55 हजार किंमतीचे 1 किलो 151 ग्रॅम मॅफेड्रोन याशिवाय मोबाईल फोन, वजन काटे, बॉटल्स असा एकूण 68 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीसी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड म्हणाले, अटकेत असलेले आरोपी मागील एक ते चार वर्षांपासून पुण्यात राहत असून मेडिकल, स्टुडंट, बिजनेस व्हिसावर पुण्यात आले आहेत. मनफ्रेंड मंडा पुण्यात बीफार्म शिक्षण घेत आहे तर त्याची पत्नी अनस्टाझिया हैदराबाद येथे एमबीए करत आहे.

हसन कासिद कपडे, बूट विक्री व्यवसाय करतो तर पर्सि आणि शामिम टुरिस्ट व्हिसावर भारतात आले. बेका फाउमी यास अस्थमा त्रास असल्याचे सांगत दिल्लीत अपोलो रुग्णालयात उपचारासाठी मेडिकल व्हिसावर आला आहे. त्यांनी हे मेफेड्रोन कुठून आणले, कुणाला विकणार होते याचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.ही कारवाई सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, अंमलदार प्रविण शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, रुबी अब्राहम, मनोज साळुंके, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, रेहाना शेख, योगेश मोहिते, यांच्या पथकाने केली.

हाय प्रोफाईल पाटर्यांसाठी पुरवठ केल्याची शक्‍यता

मेफेड्रोन व कोकेन हे पार्ट ड्रग्ज म्हणून ओळखले जाते. त्याचा वापर हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये तसेच पबमध्ये केला जातो. यामुळे त्याचे खरेदीदार कोण आहेत ? याचाही तपास पोलीस यंत्रणा करणार आहे.

Post a comment

0 Comments