डॉ. पी. ए. इनामदार यांना मुस्लिम बँक अध्यक्षपदी राहण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.


 पुणे : डॉ. पी. ए. इनामदार यांना मुस्लिम बँक अध्यक्षपदी राहण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवारी)दिलेल्या अंतरिम आदेशाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या .एस के कौल,न्या.आर एस रेड्डी यांनी याबाबतचा निकाल दिला.आज झालेल्या सुनावणीदरम्यान एड.मुकुल रोहतगी आणि एड कृपाल यांनी डॉ.पी.ए.इनामदार यांची बाजू मांडली.एड.अमोल चितळे,एड.प्रज्ञा चितळे यांनी त्यांना सहाय्य केले. 

एस एम इकबाल,असिफ खान,इम्तियाझ शिकीलकर यांनी केलेल्या तक्रारींवर तत्कालीन सहकार आयुक्त सतीश सोनी,तत्कालीन सहकार मंत्री  सुभाष देशमुख  इनामदार यांच्या अपात्रतेचा आदेश काढला होता.या आदेशाला उच्च न्यायालयात डॉ पी ए इनामदार यांनी आव्हान दिले होते.  उच्च न्यायालयात   ५ सप्टेंबर २०१९ रोजी इनामदार यांच्या बाजूने निर्णय  निर्णय दिला होता.  त्यावेळेस उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध तक्रारदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि उच्च नायालयाच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती घेतली होती .

  आज त्याबाबत सुनावणी होऊन अंतरिम स्थगिती उठविण्यात आली आणि इनामदार यांना बँकेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत राहण्याची मुभा देण्यात आली.बँकेचे सभासद,संचालक आणि हितचिंतकांनी  डॉ पी ए इनामदार यांचे अभिनंदन केले.


(अधिक माहिती साठी संपर्क :डॉ पी ए इनामदार :9822022171)


------------------


Post a Comment

Previous Post Next Post