पुणे : जिल्हा न्यायालय व परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा .पुणे : शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली असतानाच जिल्हा न्यायालय व परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. न्यायालयाच्या आवारात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाला एकप्रकारे आमंत्रणच मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्याची यंत्रणा देखील येथे पुरेशी नाही

गेल्या वर्षी सुमारे नऊ महिने न्यायालयाचे कामकाज बंद राहिल्यामुळे प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी न्यायालयात पक्षकार आणि वकिलांची गर्दी वाढली आहे. आरोपींना समन्स, वॉरंट बजावण्यासाठी अथवा त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांचीही न्यायालयात वर्दळ पाहायला मिळत आहे. आरोपीला न्यायालयात आणल्यावर त्याचे नातेवाईक देखील मोठ्या संख्येने न्यायालयात त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये न्यायालयातील गर्दी वाढली आहे.

पिचकाऱ्या थांबल्या नाहीत
न्यायालयाच्या आवारात तंबाखू, गुटखा, खाऊन थुंकणाऱ्यांवर गेल्या वर्षी कारवाई करण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जस्त केले होते. या मोहिमेअंतर्गत दोन पोलिसांवरच कारवार्इ करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाच्या भिंती रंगविण्याचे प्रमाणात कमी झाले होते. मात्र, आता अनेक जण न्यायालयाच्या आवारातच पिचकाऱ्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे न्यायालयात कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

''उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून वॉरंट किंवा समन्स बजावण्यात आला तर पक्षकारांना न्यायालयात यावेच लागते. बहुतांश गर्दी ही आरोपींसमवेत येणाऱ्या लोकांचीच आहे. विनाकामाचे न्यायालयात येऊ नका असे त्यांना सांगण्यात आले आहे. वकिलांनी गर्दी करू नये असे आम्ही प्रत्येक कोर्ट हॉलमध्ये जाऊन सांगत आहे.''

अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन राहात आहेत.

Post a comment

0 Comments