करोनाबाधितांची अपुरी माहिती देणाऱ्या शहरातील तीन पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करत महापालिकेने ते सील केले 

पुणे - करोनाबाधितांची अपुरी माहिती देणाऱ्या शहरातील तीन पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करत महापालिकेने ते सील केले. अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. सबर्बन, मेट्रोपोलीस आणि क्रस्ना अशी लॅबची नावे आहेत.

तपासणीसाठी आलेल्या आणि करोनाबाधित सापडलेल्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणे, त्यांचे व्यवस्थित रेकॉर्ड न ठेवणे अशी या लॅबविषयी तक्रार आहे. या चुकांमुळे जवळपास 30 टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधच लागत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे या तीनही लॅबची कोविड चाचणी यंत्रे सील करण्यात आली आहेत.खासगी लॅबमध्ये चाचणी करताना संबंधित व्यक्‍तीचे नाव, पूर्ण पत्ता, मोबाइल नंबरसह सर्व अद्ययावत माहिती पालिकेने दिलेल्या नमुन्यामध्ये 24 तासांच्या आत भरून देणे आवश्‍यक आहे. पालिकेने वारंवार तोंडी अथवा फोनद्वारे सूचना दिलेल्या होत्या. तीन वेळा पत्र पाठवले होते आणि लेखी खुलासा मागवला होता.

Post a comment

0 Comments