पुणेरी मिसळीने आगळा विश्वविक्रमच केला. सात तासांत सात हजार किलो मिसळ तयार करण्यात आली.

 


पुणे : मिसळ म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. झणझणीत, तर्रीदार आणि ठसकेबाज मिसळीचे नानाविध प्रकार आहेत. पुणेरी मिसळ ही तर खासच. चमचमीत चवीच्या पुणेरी मिसळीने आज आगळा विश्वविक्रमच केला. सात तासांत सात हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. एवढेच नव्हे तर ही मिसळ तीन तासांत 30 लोकांच्या मदतीने 300 एनजीओंम़ार्फत 30 हजार गरीब व गरजू लोकांपर्यंत पोचवण्यात आली.

सूर्यदत्ता गुप ऑफ इन्स्टिटय़ूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ रविवारी बनवण्यात आली. जगात पहिल्यांदाच एकढय़ा मोठय़ा स्करूपात मिसळ बनवण्यात आली. गिनीज, लिम्का, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार आहेरविवारी पहाटे 2 ते सकाळी 9 या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली. तर सकाळी 9 ते दुपारी 12 या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, 500 किलो कांदा, 125 किलो आले, 125 किलो लसूण, 400 किलो तेल, 180 किलो कांदा-लसूण मसाला, 50 किलो मिरची पावडर, 50 किलो हळद, 25 किलो मीठ, 115 किलो खोबरे, 15 किलो तेजपत्ता, 1200 किलो मिक्स फरसाण, 4500 लिटर पाणी, 50 किलो कोथिंबीर वापरण्यात आली. त्यातून ही मिसळ झणझणीत झाली. मोठय़ा कढईत ती तयार करण्यात आली.

गरजूंना अन्नदान आणि विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक

पुणेरी मिसळ पुण्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे महामिसळ तयार करून विश्वविक्रम कराका. या महामिसळच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नदान करावे आणि आमच्या संस्थेतील हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन आदी विभागाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्यक्षिक अनुभव मिळावा, हा उद्देश होता, असे 'सूर्यदत्ता'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. याआधी सर्वात मोठा पराठा, पाच हजार किलो खिचडी, चार हजार किलो वांग्याचे भरीत, सर्वात मोठा कबाब असे अनेक विश्वविक्रम केले आहेत. प्रत्येक विश्वविक्रमावेळी हजारो लोकांची गर्दी असते. यावेळी मात्र केवळ 25-30 लोकांमध्ये हा विश्वविक्रम झाला, असे मास्टरशेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments