संत सोपानकाका सहकारी बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न

 पुणे :   कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संत सोपानकाका सहकारी बँकेची २३ वी वार्षिक सभा रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळत ऑनलाईन सभासदांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाली.

               सभेच्या सुरवातीला कोरोनाच्या महामारीमुळे निधन झालेल्या बँकेचे सभासद, खातेदार हितचिंतक ज्ञात-अज्ञात दिवंगत झालेल्या सर्व व्यक्तींना बँकेच्या वतीने नम्रतापूर्वक भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतर माझ्यासमवेत, बँकेचे उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून सभेला सुरवात करण्यात आली.

         सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.दिलीप साबणे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले व विषयवार सभेस सुरवात झाली.विषय पत्रिकेवर १ ते १८ विषय होते. प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली व सभासदांनी ऑनलाईन विचारलेल्या प्रश्नांना योग्य समर्पक उत्तरे मी बँकेचा चेअरमन व सभेचा अध्यक्ष या नात्याने दिली. सदर सभेस विविध ठिकाणाहून ७८० सभासदांनी ऑनलाईन नोंदणी करून सभेत सहभागी झाले होते.

                 बँकेचे संस्थापक सदस्य प्रा.एम.एस.जाधव सर, प्रीतम शिंदे , श्रीमंत कुमार पवार, अनिल उरवणे, सुषमा वाघ, मयूर जाधव, प्रमोद भोसले, बाळासाहेब चव्हाण, मनुश्री बनसोडे, चेतन महाजन, पप्पू झुरुंगे, रमेश दायगुडे, निलेश कोंढाळकर, तुषार देशमुख रिझर्व बँकेचे माजी सहाय्यक महा प्रबंधक श्री. अरविंद नाईक साहेब, महादेव शेवाळे, इत्यादी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना सभेचे व  बँकेचे अध्यक्ष यांनी समर्पक उत्तरे दिली. जवळ जवळ २ तास ऑनलाईन चाललेल्या सभेचे नियोजन बँकेच्या वतीने करण्यात आले.

            सदर सभेला बँकेचे उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया, हेमंतशेठ भोंगळे,राजेंद्र बडधे , धनंजय काकडे, मनोहर पवार, अनिल वीरकर,शरदचंद्र जगताप, संजय आंबेकर, सौ.पल्लवी बाजारे , धनसीग भापकर, रवी जोशी , अड .युवराज वारघडे इत्यादी संचालक मंडळ व चंद्रशेखर जगताप, गणेश मोहळ, विश्वजित आनंदे, अखिल  शिंदे, अनिकेत माळवदकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.


#SantSopankakaBank #SanjayJagtap #AnnualMeeting2021

Post a comment

0 Comments