ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन
पुणे :  रंगभूमीवर आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे.

अभिनेते श्रीकांत मोघे यांनी 'प्रपंच' या सिनेमाद्वारे १९६१ मध्ये त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला होता. या दरम्यान जमाना, उलझन, ढॉंग, अंडर सेक्रेटरी, मिट्टी की गाडी यांसारख्या हिंदी नाटकांमधून देखील त्यांनी काम केले.मराठीमध्ये 'वाऱ्यावरची वरात', 'अशी पाखरे येती' , 'लेकुरे उदंड झाली' आणि 'मृत्युंजय' अशा गाजलेल्या नाटकांतून त्यांनी ‘मृत्युंजय’ या नाटकातली बाळ धुरी यांची प्रमुख भूमिका जशी लक्षणीय ठरली तशीच श्रीकांत मोघे यांची दुर्योधनाची भूमिका प्रचंड गाजली.

त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलावंतांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे घेतले, तर आपले बीएससीचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय घेतले. यानंतर त्यांनी मुंबई गाठली. तिथे त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली.विशेष म्हणजे शालेयवयातच त्यांनी आपला मोर्चा नाट्यअभिनयाकडे वळवला. त्यांनी महाविद्यालयात शिकताना ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही केले होते. महाविद्यालयातील संंमेलनात (गॅदरिंग) त्यांनी ‘घराबाहेर’ आणि ‘लग्नाची बेडी’ यांसारखी नाटकेही केली. 

Post a comment

0 Comments