एकाच गल्लीत किंवा सोसायटीत सतत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास तात्पुरत्या काळासाठी 'सील



 पुणे : एकाच गल्लीत किंवा सोसायटीत सतत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास आता गल्ली आणि सोसायटीही तात्पुरत्या काळासाठी 'सील' केल्या जात आहेत. म्हणजे, याठिकाणी अन्य भागातून लोकांना ये-जा करता येणार नाही. वाहतूक आणि अन्य व्यवहारांवर मर्यादा लादल्या जाणार आहेत. परंतु, अत्यावश्‍यक सेवा या पूर्ववत असतील.

शहराच्या विविध ६२ भागांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे आकडे आहेत. त्यामुळे हे परिसर आता सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असून, खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या आहेत. याआधी गेल्या आठ दिवसांपूर्वी सूक्ष्मबाधित क्षेत्रांची संख्या ४२ इतकी होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्या-त्या भागांमधील रुग्णसंख्या पाहून उपाय केले जात आहेत.त्यात, पूर्वीसारखे रस्ते बंद करणे, दुकाने बंद ठेवण्यापेक्षा रुग्णांना घराबाहेर न येऊ देण्यापासून त्याच्या संपर्कात लोका जाता येणार नाही.यादृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यात रुग्णवाढीचे प्रमाण, त्या कालावधी पाहून संबंधित भाग हे सूक्ष्मबाधित क्षेत्र जाहीर केले जात आहेत. कठोर उपाय करून लोकांची हाल होऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात सर्वाधिक रुग्ण असलेली सोसायटी आणि गरजेनुसार परिसरात मर्यादा लागू करण्यात येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग पाहून कुठे कोणत्या स्वरूपाच्या मर्यादा लागू करायच्या याच्या नियोजनाची जबाबदारी ही क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. एखाद्या भागात सलग पाच दिवस रुग्ण वाढत असतील, तो भाग 'सील' करावा, असा नियम आहे. तर एका सोसायटीत पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्यास ती सोसायटी ही सूक्ष्मबाधित क्षेत्र असू शकते, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post