संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे यांचा जमियत उलेमाये हिंद च्या वतीने गौरव करण्यात आला.पुणे : संभाजी ब्रिगेड चे सतीश काळे यांचा जमियत उलेमाये हिंद च्या वतीने गौरव काळेवाडी  येथे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांचा पिंपरी चिंचवड जमियत उलेमाये हिंद च्या वतीने करण्यात आला.

 त्यांच्या प्रबोधन , विविध सामाजिक विषयांवरील आंदोलने  , हिंदू मुस्लिम एकता याबद्दल योगदानाबद्दल त्याना प्रोत्साहन देण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना *जमियत उलेमाये हिंद चे पिंपरी चिंचवड प्रमुख हाजी गुलजार शेख यांनी  संभाजी ब्रिगेडच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील  हिंदू मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणवर प्रबोधन झाले . तसेच शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहचुन हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटे विरुद्ध सतीश काळे यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक केले .तसेच देशासाठी , समाजासाठी ,लढत असताना पूर्ण मुस्लिम समाज आपल्यासोबत आहे* असे आश्वासन दिले . 

               यावेळी अपना वतन चे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून सांगितले . तसेच काही कट्टरवादी समाजकंटकांकडून द्वेषच बीज रोवण्याचे काम चालू असून कोणत्याही समाजाने त्यास बळी न पडता कायदेशीर व अहिंसक मार्गाने त्याचा प्रतिकार केला पाहिजे असे नमूद केले. 

यावेळी सत्कार स्वीकारताना *सतीश काळे यांनी सांगितले कि, या अनपेक्षित सत्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असून मला कार्य करण्यासाठी अजून बळ मिळाले आहे. यापुढे सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करू असे त्यांनी सांगितले.

या वेळी हाजी गुलजार शेख यांच्या हस्ते पुष्पगुछ व शाल देऊन सतीश काळे यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , गुलाम मोहम्मद ,उस्मान शेख ,मौलाना इस्लामुद्दीन ,मौलाना निजामुद्दीन ,ताजोद्दीन तांबोळी , अपना वतनचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष हमीद शेख यांसह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रम कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून घेण्यात आला.


अधिक माहिती व संपर्कासाठी :

*मा. सिद्दीकभाई शेख ,*

*संस्थापक ,अध्यक्ष ,अपना वतन संघटना* 

*मो. ९६६५४८४७८६*

Post a comment

0 Comments