शहरातील कर थकविणाऱ्या 118 बड्या मालमत्ताधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली आ

  पिंपरी - मार्चअखेर येऊनही शहरातील अनेक मालमत्ताधाराकांनी कर भरलेला नाही. शहरातील कर थकविणाऱ्या 118 बड्या मालमत्ताधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या आठवड्यामध्ये कारवाईची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. शेवटची नोटीस देऊन थकबाकी अदा न केल्यास मालमत्ताजप्तीची कारावाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने आतापर्यंत 495 कोटींचा मालमत्ताकर जमा केला आहे. 31 मार्चपर्यंत आणखी 375 कोटींची रक्कम करदात्यांकडून वसूल करण्याचे मोठे आव्हान करसंकलन विभागापुढे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, यापुढे थकबाकीदारांवर मालमत्ताजप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.तसेच तत्पूर्वी थकबाकीदारांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळावर, तसेच क्षेत्रीय दर्शनी भागात लावण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांनी 31 मार्चपूर्वी संपूर्ण थकबाकीसह बिलाची रक्कम भरावी आणि 75 टक्के विलंब शुल्कात सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. आतापर्यंत सात हजार 401 मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला असून, 88 कोटी 49 लाखांचा भरणा केला आहे.

करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करआकारणी आणि करसंकलन विभागाने थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. अंदाजपत्रकीय उद्दिष्टापेक्षा 375 कोटी रुपयांनी मालमत्ताकर कमी वसूल झाला आहे. आगामी दहा दिवसांमध्ये तेवढे उदिष्ट साध्य करणे प्रशासनापुढे आव्हान आहे. त्यामुळे महापालिकेकडून मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ताजप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

ही कारवाई मार्च महिन्यानंतरही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांना सर्व करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ताकराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments