सफाई कामगारांना मुंबई मनपाने एसआरए आणि एमएमआरडीए मधील घरे द्यावीत - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



मुंबई दि.6 -   मुंबई महापालिकेत 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून मालकी हक्काचे घर दिलेच पाहिजे.सफाई कामगारांना केंद्र सरकार ने कोरोनायोद्धा दर्जा दिला आहे.सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे धुळे सारख्या महापालिकेने दिली आहेत.  सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी मुंबई मनपाने आपल्या मोठ्या बजेट मधील 5 टक्के निधीची तरतूद करावी. तसेच एस आर ए योजनेतून महापालिकेला मिळणारी घरे आणि एमएमआरडीए कडील घरे राज्य शासनाच्या सहकार्यातून ती घरे सफाई कामगारांना द्यावीत अशी सूचना

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेला केली आहे. 

 मुंबईत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे  विविध विषयांवर आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेस ना.रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; काकासाहेब खंबाळकर; गौतम सोनवणे;दयाळ बहादूरे: ऍड.अशा लांडगे; प्रकाश जाधव; जगदीश गायकवाड; जयंती गडा ; लखमेन्द्र खुराणा; सिद्धार्थ कासारे बाळासाहेब गरुड; सोना कांबळे; सुमित वजाळे आदी मान्यवर उपस्थित  होते.

मुंबई मनपा च्या 3 हजार सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्यायची आहेत. आता पर्यंत एसआरए योजनेतून मुंबई मनपा ला 24 हजार घरे मिळाली आहेत.त्या मुळे एस आर ए मधून मुंबई मनपाला मिळणारी घरे सफाई कामगारांना द्यावीत अशी सूचना ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना या बैठकीत दिली.  मनपा च्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि महापौर यांना आजच्या बैठीकीचा अहवाल देणारे  पत्र पाठविणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.

सफाई कामगारांच्या हजेरी चौकी बांधाव्यात तिथे महिला सफाई कामगारांसाठी चेंजिंग रूम; स्वच्छता गृह आणि जल जोडणी द्यावी याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येऊन तसे निर्देश केंद्रीय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना  दिले.

 मुंबईत आणि राज्यभर पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे.  

  अशात मुंबई मनपा च्या सफाई कामगारांना पुन्हा हॅन्डग्लोव्हज; सॅनिटाईझर; मास्क आदी वस्तू आणि सुविधा द्याव्यात  तसेच सफाई कामगारांच्या विविध समस्या अंक मागण्या म्युनिसिपल मजदूर संघाच्या प्रकश कमलाकर  जाधव यांनी केल्या. त्यावर उपयुक्त मराठे यांनी त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन काम करेल असे आश्वासन दिले.

सफाई कामगारांच्या हजेरी चौकी मध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावेत.तसेच महिला सफाई कामगारांना  स्वतंत्र ड्रेस चेंजिंग रूम 

आणि स्वच्छता गृह बांधून द्यावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना केली. महिला लैंगिक शोषण विरुद्ध  दक्षता समिती चा बोर्ड सफाई कामगार हजेरी चौकी वर लावण्यात यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केली. सफाई कामगारां च्या विविध मागण्यांकडे लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी झालेल्या बैठकीत ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना  दिले. 

महाड येथील चवदार तळे  आणि परिसर सुशोभिकरण बाबतही यावेळी ना रामदास आठवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 20 मार्च ला दरवर्षी आंबेडकरी जनता महाड चवदार तळ्याला भेट देऊन अभिवादन करते. अनेक लोक चवदार तळ्यातील पाणी भक्तिभावाने कृतज्ञ भावनेतून प्राशन करतात. मात्र चवदार तळ्याचे पाणी सध्या पिण्यायोग्य राहिलेले नाही.त्या पाण्याचे शुद्धीकरण करावे. त्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.मात्र  जीवन प्राधिकरण आणि महाड नगर परिषद यांच्या वादातून महाड चवदार तळे आणि तेथील शाहू महाराज सभागृह यांची दुरुस्ती अद्याप प्रलंबित असल्याची माहिती या बैठकीत उघडकीस आली.त्यावर महाड नगर परिषदेने टेंडर काढले असून लवकरच जल शुद्धीकरण यंत्र महाड चवदार तळे येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीला महाड नगर परिषद चे अभियंता आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.पनवेल चे उपमहापौर  जगदीश गायकवाड; प्रकाश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 कल्याण मधील एन आर सी कंपनीतील कामगारांना न्याय देण्याबाबत बैठक घेण्यात आली. कामगारांची देनी अदाणी ग्रुप ने द्यावीत.या बाबत न्यायालयाचा निर्णय अदानी कंपनी मान्य करेल असा विश्वास अदानी ग्रुप च्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले. 



            

Post a comment

0 Comments