वीजबिलांची थकबाकी असलेल्या सर्वांनी थकबाकी भरणे आवश्‍यक आहे. सरकारचा वीज ग्राहकांना जोर का झटका. मुंबई - महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्‍यक असून त्यासाठी वीजबिलांची थकबाकी असलेल्या सर्वांनी थकबाकी भरणे आवश्‍यक आहे, असे सांगत विधानमंडळामध्ये दि. 2 मार्च, 2021 रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचे निवेदन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात केले.

दि. 2 मार्च, 2021 रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरणद्वारे वीज जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या अधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले होते. अनुषंगाने ऊर्जामंत्री राऊत यांनी बुधवारी निवेदन केले.

Post a comment

0 Comments