येवलेवाडी प्रभाग नंबर 41, पाटील वस्ती मध्ये ड्रेनेज व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला.


कोंढवा  :  माजी उपसरपंच दादा कामठे , विशाल कामठे  यांच्या  सततच्या पाठ पुराव्यामुळे येवलेवाडी प्रभाग नंबर 41 मधील  पाटील वस्ती येथे आज सायंकाळी ड्रेणेज व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ  या भागातील नगरसेवक  सौ वृषाली ताई कामठे , वीरसेन जगताप ,गावचे उपसरपंच दादा कामठे, विशाल कामठे , स्वीकृत नगरसेवक अनिल येवले ,सतीश मारकड स्वीकृत नगरसेवक, प्रमोद टिळेकर , हारून शेख व या भागातील समस्त ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थित पूजा करून नारळ वाढवून भूमी पूजन समारंभ करण्यात आला.

    या भागातील ग्रामस्थांनी नगरसेवकांना आपल्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी सोडवण्यासठी  जोरदार प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन  समस्त ग्रामस्थांना समोर नगरसेवकांनी दिले.

Post a comment

0 Comments